
राजापूर : बँकेच्या 103 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने बँकेच्या सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजती केली होती. यावेळी त्यांनी बँकेच्या चढत्या आलेखाची माहीती दिली. यावेळी व्हाईस चेअरमन विवेक गादीकर, संचालक जयंत अभ्यंकर, संजय ओगले, पकाश कातकर, दिनानाथ कोळवणकर, पसाद मोहरकर, सौ.पतिभा रेडीज, सीईओ शेखरकुमार अहिरे, लेखपार रमेश काळेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी विना सहकार नही उध्दार या सहकाराच्या ब्रिद वाक्याचा विशेष उद्घोष करताना आम्हाला आनंद होत आहे की, या आर्थिक वर्षात बँकेने चांगला बँकींग व्यवसाय करताना आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण ठेवी या रु.473 कोटी 50 लाख, कर्ज व्यवहार रु.298 कोटी 20 लाख, अहवाल वर्षात बँकेला निव्वळ नफा रु.3 कोटी 22 लाख 62 हजार, 10 टक्के लाभांश, गेली अनेक वर्षे वैधानिक लेखापरिक्षणात कायम 'अ' वर्ग राखलेला असून याही वर्षी ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे. बँकेचे ढोबळ एन.पी.ए.प्रमाण 1.23 टक्के इतके राखण्यात यश संपादन केलेले आहे. सातत्याने गेली 14 वर्षे नक्त एन.पी.ए.प्रमाण 0 टक्के, राखण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळेच आपल्या बँकेच्या सन 2023-24 च्या वार्षिक प्रगतीचा आलेख हा पुन्हा उच्चस्थानी कायम ठेवण्यात बँकेने निश्चितच यश मिळविले आहे. या बरोबरच बँक रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार एफएसडब्लूएमचे सर्व निकष पूर्ण केले असल्याची माहीती दिली.
बँकेच्या संचालक मंडळाच्या व प्रशासनाच्या पाठिशी खंबीरपणे उभे असलेले सभासद व ग्राहक यांच्यामुळे प्रत्येकवेळी बँकेने व बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांनी मानाचे पुरस्कार वेळोवेळी प्राप्त केले असल्याची माहीती दिली. बँकेच्या सर्व शाखा या स्वमालकीच्या जागेत व्हाव्यात अशी सभासदांची कायम आग्रही मागणी होत आहे. त्या नुसार बँकेने या पूर्वी प्रधान कार्यालयासह राजापूर, रत्नागिरी, मालवण या शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यान्वीत केलेल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात लांजा शाखा देखील स्वमालकीच्या जागेत कार्यान्वीत करण्याचा मानस संचालक मंडळाचा असून त्या दृष्टीने लांजा बाजारपेठेतील मोक्याच्या ठिकाणी जागा खरेदी करण्याबाबत साठेखत बँकेने केलेले असून पुढील 2-3 महिन्यांमध्ये लांजा शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यान्वीत होणार आहे.
त्याच प्रमाणे बँकेच्या जुन्या सा. नाटे व पाचल शाखांसाठी मोक्याच्या जागा उपलब्ध होणेसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असून जागेसाठी पाहणी झाली आहे. मात्र सदर जागांमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे जागा खरेदी व्यवहार अद्याप प्रलंबीत राहिले असून त्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत, त्यांचे निराकरण झाल्यास या ही शाखा भविष्यात स्वमालकीच्या जागेत कार्यान्वीत करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे सांगितले.