राजन तेलींचा वाढदिवस ; वेंगुर्ल्यात फुलविक्रेतांना छत्र्यांचे वाटप

Edited by: दिपेश परब
Published on: July 25, 2023 11:53 AM
views 797  views

वेंगुर्ले : भाजपा नेते माजी आमदार राजन तेली यांचा वाढदिवस सेवादिन म्हणून करण्याचा निर्णय वेंगुर्ले भाजपाने घेतला आहे. त्यानुसार आज सकाळी मंदिराकडील फुल विक्रेत्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

श्री. तेली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज वेंगुर्ले शहरातील  श्री देव रामेश्वर मंदिर व श्री मारुती मंदिर येथे भाजप पदाधिकारी यांनी पूजा केली. त्यांनतर तेथील फुल विक्रेते किरण काटवी, नरेंद्र किनळेकर, चंद्रभागा कुबल, विमल मांजरेकर, गीता वेंगुर्लेकर यांना पावसाळ्यात सुरक्षेसाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शरद चव्हाण श्री देव रामेश्वर देवस्थानचे मानकरी रवी परब, दाजी परब तसेच वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, प्रणव वायंगणकर, प्रकाश रेगे, राजेश कांबळी, संतोष सावंत प्रीतम सावंत पुंडलिक हळदणकर वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, शेखर काणेकर, रवी शिरसाट, शरद मेस्त्री, ओंकार चव्हाण आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.