
सावंतवाडी : गेल्या पंधरा वर्षात आरोंदा गावाचा कोणताही विकास आमदार दीपक केसरकर यांनी केला नाही.या ठिकाणी फक्त घोषणा आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता तुम्हीच येणाऱ्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकासकरा अशी मागणी आरोंदा गावातील जेष्ठ शिवसैनिक बाळा आरोंदेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्याकडे बैठकीत केले. यावेळी मालवणच्या धर्तीवर येणाऱ्या सहा महिन्यात गावातील लोकांना विश्वात घेऊन या गावाचा कायापालट झालेला दिसेल असे आश्वासन श्री तेली यांनी यावेळी दिले.
यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर राघवेंद्र नार्वेकर रवींद्र म्हापसेकर नम्रता झारापकर साधना कळंगुटकर प्रशांत नाईक आबा केरकर आधी उपस्थित होते. श्री तेली यांनी सावंतवाडी तालुक्यातील बांदा, कास,मडूरे, डेगवे, निगडे, तळवणे, आदी गावात मतदारांशी जाऊन गाव भेट निमित्त ते बोलत होते. आरोंदेकर म्हणाले, केसरकर यांनी कार्यकर्त्यांना कोणतेही बळ दिले नाही.तसेच आरोंदा गावचा विकास करा पर्यटनाच्या माध्यमातून निधी द्या अशी मागणी वारंवार केली .मात्र केसकर यांनी काहीच विकासात्मक केले नाही त्यामुळे तुम्ही आता पर्यटनाच्या माध्यमातून विकास करा अशी मागणी गावच्या वतीने श्री तेली यांच्याकडे केली. तर या निवडणुकीत श्री तेली यांना भरघोस मते देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री तेली म्हणाले, या गावाच्या मी कटिबद्ध आहे.गावातील लोकाना विश्वासात घेऊनच पर्यटनाच्या माध्यमातून विकास केला जाईल या निवडणुकीत तुम्ही ठाकरे शिवसेनेला मतदान करा येणार्या काळात तुमच्या मनातील विकास करण्याचा माझा मानस आहे.तर याठिकाणी रोजगार नसल्यामुळे गोवा राज्यात युवकांना नोकरीला जावे लागते दुर्दैवी अपघातात एकदाचा मृत्यू होतो. याला जबाबदार आज केसरकर आहेत असा टोला हाणला.