दीपक केसरकरांना मुंबईत उमेदवारी द्या : राजन तेली

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 09:05 AM
views 327  views

सावंतवाडी : पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेत भाजपचा उमेदवार सावंतवाडीतून‌ द्यावा अशी मागणी करणार आहे. माझी पार्टी इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेल तर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार आजवर फसवणूक करत आल्याने आपली सिट पडणार नाही याची खबरदारी महायुती घेईल असं विधान माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले. तर, केसरकर मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांना तिथेच उमेदवारी द्या असा टोलाही श्री. तेली यांनी हाणला.


ते म्हणाले, केसरकर यांनी ते घोषणामंत्री कसे आहेत हे सिद्ध केले आहे. ताज हॉटेलच्या शुभारंभाची त्यांनी तिसऱ्यांदा घोषणा केली आहे. याबद्दल मुंबईत मंत्रालयात कोणाला माहितीही नाही आहे. एमआयडीसीत एखादा मंत्री उद्योजकाला घेऊन जातो हे दृश्य महाराष्ट्रात नवीन आहे. यामागे गौडबंगाल काय आहे? असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी केला. तसेच पंधरा वर्षात दीपक केसरकर यांनी काय केलं ? ५० लोकांना रोजगार देणारा एखादा प्रकल्प आणला का ? केवळ घोषणा करण्याचे काम केसरकर यांनी केलं. हरीत क्षेत्रात लाल श्रेणीत येणार का ? असा सवाल अभ्यासक करत आहेत. त्यामुळे राजस्थानच्या कंपनीला जागा आणून दाखवत काय साध्य करणार ? लोकांना रोजगार कसा देणार असा सवाल त्यांनी केला.


दरम्यान, मल्टीस्पेशालिटी, ॲम्युझमेंट पार्कच भुमिपूजन करणार अशा घोषणा केसरकर यांनी केल्या आहेत. उद्योग येणार असं केसरकर दाखवत आहेत. सावंतवाडी मतदारसंघाला भकास करण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे केसरकरांना घरी बसवल तरच या मतदारसंघात काहीतरी घडेल. फिशरीच व्हिलेजची संकल्पना गेली दहा वर्षं मांडत आहेत. आज पुन्हा तीच घोषणा केसरकर करत आहेत. त्यांचा बगलबच्चा असणारा आर्किटेक्ट अमित कामत त्याच प्रेझेंटेशन दाखवत आहेत. लोकांची चेष्टा त्यांनी लावली आहे. लोकांचा विश्वास केसरकर यांनी गमावलेला आहे. त्यामुळे विकासकामांवर बोलायला आमने-सामने या, असं आव्हान पुन्हा एकदा तेली यांनी केसरकर यांना दिलं. तर सगळे प्रकल्प लोकांची फसवणूक करणारे व डोळ्यात धूळफेक करणारे आहेत असा घरचा आहेर दिला. 


राणेंना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही म्हणून सांगणारे केसरकरच त्रास देणारे एक होते हे जुने व्हिडिओ दाखवत राजन तेलींनी सादर केले. लोकांची चेष्टा लावली आहे. सावंतवाडीत भाजपचा उमेदवार द्यावा अशी मागणी करणार आहे. माझी पार्टी इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेल तर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार फसवणूक करत आल्याने आपली सिट पडणार नाही याची खबरदारी महायुती घेईल असं मत व्यक्त केले. तर मुंबईचे पालकमंत्री केसरकर आहेत त्यामुळे त्यांना तिथेच उमेदवारी द्या असा टोला हाणला.