
सावंतवाडी : लोकांचा उत्साह बघता माझा विजय निश्चित आहे. लोकांच मतदान विकासाला आहे. निर्भिडपणे लोक मतदान करतील असं मत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी व्यक्त केले. श्री. तेली यांनी सावंतवाडी येथील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठ वाजता सहकुटुंब त्यांनी मतदान केले. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्या सावंतवाडीचा आमदार महाविकास आघाडीचा असणार आहे असा विश्वास व्यक्त केला. यावेळी सौ. तेली, सर्वेश तेली आदी उपस्थित होते.