
सावंतवाडी : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मंगळवारी २९ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केले आहे.
दरम्यान, शुक्रवारी कोणताही गाजावाजा न करता प्रांताधिकारी कार्यालयात येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांना संपर्क साधला असता श्री. तेली यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती दिली. मात्र, त्यासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजन तेली २९ तारीखला पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी याबाबतचे आवाहन केले आहे. मात्र, शुक्रवारी घाईगडबडीत तेलींनी भरलेल्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.