विकास कामे केली असती तर मंदिर, मशीद, चर्चची आठवण झाली नसती

राजन तेलींचा केसरकरांना टोला
Edited by:
Published on: November 18, 2024 13:40 PM
views 160  views

सावंतवाडी : गेल्या पंधरा वर्षात तुम्ही या भागाचे आमदार आहात. आठ वर्ष मंत्री म्हणून कार्यरत होता. मग, तुम्ही विकास कामे केली असती तर तुम्हाला आता मंदिर,मशीद, चर्च यांची आठवण झाली नसती. तुम्ही आतापर्यंत काहीच केले नाही. नाहीतर जनतेला आमिष दाखवण्याची वेळच आली नसती. सुज्ञ जनतेने यांच्या आमिषाला बळी न पडता यांच्या भूलथापाना बळी पडू नका. मात्र, ते जे काय देत असतील ते बिनधास्त घ्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी केले. 

श्रीराम वाचन मंदिर झालेल्या प्रचार सभेत केली काँग्रेसच्या वतीने ही प्रचार सभा घेण्यात आली होती. यावेळी श्री तेली यांनी आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मंत्री दीपक केसरकर दहशतवाद अनुपात आहेत यापूर्वी त्यांनी दहशतवाद विरोधात रान उठवले होते मग आताच ते दहशतवादासोबत मांडीला मांडी लावून बसत आहेत हा दहशतवाद त्यांना चालतो का असा सवाल करत आता आपल्या सर्वांवर एकच वेळ आली आहे की हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशतवाद कायमचा नेस्तनाबूत करण्याची आणि ही निवडणूक त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर राजू मसूरकर तालुका अधक्ष महेंद्र सांगेलकर शहराध्यक्ष अड‌ राघवेंद्र नार्वेकर. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख शैलेश गवंड ळकर. काँग्रेसच्या महिला पदाधिकारी एडवोकेट जस्मिन. आधी उपस्थित होते 

यावेळी श्री तेली पुढे म्हणाले पंधरा वर्षे तुम्ही या भागाचे आमदार आहात मंत्री होता मग तुम्ही विकास कामे केली असती तर तुम्हाला असे आता गावोगावी आम्ही से दाखवत फिरावे लागले नसते तुमच्या प्रचारात मुख्यमंत्री येतात उद्योग मंत्री येतात पालकमंत्री येतात खासदार येतात एवढी तुमची पळापळ का कारण तुम्ही आता घाबरला आहात. तुमचा पराभव अटळ आहे जनता तुम्हाला यावेळी धडा शिकवणार आहे तुम्ही मंत्री असतानाही या भागात काहीच केले नाही अनेक ग्रामपंचायती तसेच अनेक लोकांवर तुम्ही सूड उगवला होता. ती भाजपची मंडळी तुम्हाला आता कशी काय मदत करणार असा सवाल केला. स्वार्थासाठी तुम्ही खासदार नारायण राणे यांच्याशी एकरूप झाला मात्र आता कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत त्यावेळी तुम्हाला तो दहशतवाद वाटत नाही का मात्र यापूर्वी तुम्ही दहशतवादाविरोधात लढला आणि आता तुमच्या सोयीसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात हा दहशतवाद कायमचा संपवायचा असेल तर यावेळी तुमचे सर्वांचे एक मत महाविकास आघाडीला द्या नाहीतर एक दिवशी हा दहशतवाद जनतेला जगू देणार नाही. असेही ते म्हणाले सावंतवाडी शहरात ड्रेनेज सिस्टीम नाही आज संध्याकाळच्या वेळी घराबाहेर बसायचं तर डासांचा त्रास मग तुम्ही नेमका विकास काय केला मोती तलावाचा वेगळ्या धरतीने विकास करणे आवश्यक आहे पण तुम्ही तो कधी केला नाही आणि ती तुमची दूरदृष्टीही नाही फक्त तुम्ही स्वार्थासाठी मंत्रिपद आणि आमदार झाला. मी अशा धमक्या ना घाबरत नाही मात्र अशी प्रवृत्ती जर डोकं वर काढलं तर जनतेला फिरणे मुश्किल होईल अशी प्रवृत्ती आम्ही वाढवली ही चूक झाली पण आता ही प्रवृत्ती येथे डोके वर काढणार आहे त्यामुळे अशा प्रवृत्तीला कायमचा नेस्तराबूत करणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले आज अमिषा दाखवली जात आहेत निवडणुकीत अनेक तात्या मारल्या जात आहेत यापूर्वी कधी मशिद मंदिर चर्च आठवले नाहीत आणि आता मात्र यांना मशीद मंदिर चर्च ना मदत करण्याचे वाटत आहे तुम्ही खुशाल लोकांनी भावनेच्यासाठी आणि चांगली बाब म्हणून त्यांची हे जे काय देत आहेत ते स्वीकारावा पण तुमचं अमूल्य मत आणि अमूल्य साथ माझ्या पाठीशी राहू दे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.