राजन तेलींचा व्यापाऱ्यांशी संवाद

Edited by: विनायक गांवस
Published on: November 14, 2024 16:30 PM
views 206  views

सावंतवाडी : शहरातील व्यापारी आणि स्टॉलधारकांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. त्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवू आणि मागण्यांचा पाठपुरावा करू अशी ग्वाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी दिली. 

श्री तेली यांनी महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसमवेत शहरातील व्यापाऱ्यांशि आणि नागरिकांची संवाद साधला. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, निशांत तोरस्कर,अमोल सारंग, संदीप वेंगुर्लेकर, शब्बीर मणियार, तेजस कोटलेकर, विशाल बागकर, इक्बाल शेख, श्रीधर धडाम, वैभव म्हापसेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री तेली यांनी सहकाऱ्यांसमवेत पाचशेहून अधिक मतदारांशी संवाद साधला. त्यांना शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ असाही विश्वास व्यक्त केला आहे.