
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून माजी आमदार राजन तेली यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
राजन तेली यांनी भाजप मधून नुकतच उबाठा शिवसेनेत प्रवेश केला होता. सावंतवाडी मतदारसंघांसाठी राजन तेली यांचे नाव जाहीर झाले असून महाविकास आघाडीच्या घटकपक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या अर्चना घारे-परब कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, अर्चना घारे या निवडणुक लढण्यावर ठाम असल्याची माहीती सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे. चार उमेदवारी अर्ज त्यांच्याकडून घेतले गेलेत.