मी चाकरमानी नाही

केसरकरांवर बरसले राजन तेली
Edited by: विनायक गांवस
Published on: July 29, 2024 08:33 AM
views 348  views

सावंतवाडी : केसरकरांच्या म्हणण्याप्रमाणे मी जरी लहान कार्यकर्ता असलो तरी मी चाकरमानी नाही. मी सावंतवाडीतच असतो, लोकांना भेटतो त्यांची काम करतो. नुसती आश्वासन देत नाही असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी हाणला.

ते म्हणाले, गेळे सारख्या गावात ग्रामस्थ आज आमदारांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतात. यावरूनच मोठ्या नेत्यांच काम किती चांगल आहे हे गेळेवासियांनी दाखवून दिले आहे. असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी यांना लगावला. 

दरम्यान आता निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे कोण लहान कोण मोठ ? हे येणाऱ्या काही दिवसात जनताच ठरणार आहे. दरम्यान, ते माझ्यावर हक्कालपट्टीची कारवाई करणार होते त्याच काय झाल ? असा सवाल ही तेली यांनी यावेळी उपस्थित केला.