राजन साळवी यांच्या घरावर ACBचे छापे !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 18, 2024 06:51 AM
views 702  views

राजापूर : राजापूरचे उबाठा सेनेचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाने छापा टाकला आहे. गेले वर्षभर आमदार राजन साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु होती.

आमदार राजन साळवी, त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ यांचीही यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. आज एसीबीने हे छापे टाकले आहेत. दरम्यान राजन साळवी यांची प्रतिकीया अद्याप आलेली नाही आहे.