विलवडेतील राजा शिवाजी विद्यालय म्हणजे पंचक्रोशीचे वैभव

माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांचे गौरवोदगार
Edited by: विनायक गांवस
Published on: January 13, 2023 10:50 AM
views 168  views

सावंतवाडी : विलवडेतील राजा शिवाजी विद्यालय म्हणजे पंचक्रोशीचे वैभव आहे. विद्यालयाच्या इमारतीचा जो संकल्प संस्था व शाळेने केलेला आहे तो कौतुकास्पद आहे. विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी दिली. विलवडे ग्रामोन्नती मंडळ,मुंबई संचलित राजा शिवाजी विद्यालय विलवडे विद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. यावेळी प्रमोद कामत बोलत होते.


माजी उपसभापती कृष्णा सावंत, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, संस्था खजिनदार चंद्रकांत दळवी, डेगवे माजी उपसरपंच मधुकर देसाई, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, माजी सरपंच रविंद्र म्हापसेकर, तांबुळी सरपंच वेदिका नाईक, असनीये सरपंच रेश्मा सावंत, तांबुळी माजी सरपंच अभिलाष देसाई, बावळाट सरपंच सोनाली परब, कोनशी सरपंच साधना शेट्ये, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दिपांकर गावडे, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, भालावल उपसरपंच अर्जून परब, विलवडे उपसरपंच विनायक दळवी, सुरेश कदम, गोविंद तांबे, सोनू दळवी, हरिश्चंद्र दळवी, सहदेव दळवी, सुरेश सावंत, प्रदीप दळवी, परेश धरणे, माजी विद्यार्थाी संघटना सचिव रुपेश परब, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, अपर्णा दळवी, शिल्पा धरणे, स्नेहा दळवी, नारायण दळवी सानिका दळवी माजी मुख्याध्यापक एन.एल.सावंत, विद्या मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोंकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब म्हणाल्या की, या वर्षी दहावी परीक्षेसाठी बांद्याला जाणाऱ्या मुलांची येण्या जाण्याची सोय केली जाईल. तसेच शाळेच्या नूतन इमारतीस आपणही खारीचा वाटा उचलणार असल्याचे सांगितले. माजी उपसभापती विनायक दळवी यांनीही शाळेला नेहमीप्रमाणे सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, सूत्रसंचालन वनसिंग पाडवी, अहवाल वाचन मुकुंद कांबळे तर आभार सुहास बांदेकर यांनी मानले.


यावेळी दशक्रोशीतील उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, यांचा शाल श्रीफळ सन्मान करण्यात आला. यावेळी यावर्षी दहावी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त वैष्णवी भानुदास कांबळे, द्वितीय क्रमांक यशश्री दळवी, दीक्षा दळवी, तृतीय क्रमांक पूर्वा गवस यांना रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. आठवी नववी बरोबरच क्रीडा प्रकारात जिल्हा स्थरावर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचाही गौरव करण्यात आला. त्यानंतर मुलांचे गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाले.