राजा शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार..!

सनदी अधिकारी बनणाऱ्या विद्यार्थ्यांची शहरात मिरवणूक काढू : बबन साळगावकर
Edited by:
Published on: July 01, 2023 16:25 PM
views 119  views

सावंतवाडी : विद्यार्थी हुशार असल्याने बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण संपादन करून झळकतात. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणांना वाव देण्यासाठी पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे म्हणून हा सोहळा आहे. हुशार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होवून अधिकारी बनावे म्हणून शुभेच्छा आहेत. सनदी अधिकारी बनणाऱ्या  विद्यार्थ्यांची शहरात नक्कीच मिरवणूक काढली जाईल असा विश्वास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला.

साळगावकर म्हणाले, डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा दिली त्यामुळे जिल्हाभरात त्यांचा नावलौकिक आहे. त्यामुळे पुढील आयुष्यात देखील त्यांनी सेवा देताना गोरगरीब जनतेला सहकार्य करावे. जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर म्हणाले, राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमातून विद्यार्थी व डॉ ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना प्रेरणा मिळेल. राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्यावतीने दहावी गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सत्कार प्रसंगी बबन साळगावकर बोलत होते. 

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेतला जातो. त्यामध्ये सावंतवाडी शहरांमधील सर्व हायस्कूलच्या  विद्यार्थ्यांमधील पहिला दुसरा व तिसरा अशा ३० ते ३५ विद्यार्थ्यांचा सत्कार या मंडळाच्या माध्यमातून गोल्डमेडल, शाल श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्प देऊन करण्यात आला. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा ही कार्यक्रम या माध्यमातून आज करण्यात आल.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष दिलीप पवार,बंड्या तोरस्कर ,अरुण घाडी, सचिव दीपक सावंत ,सहसचिव महादेव राऊळ तसेच मंडळाचे आधारस्तंभ व सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव, जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे, राजू मसुरकर, प्रदीप नाईक ,आनंद रासम, विजय सावंत, सचिन बागवे व माजी नगरसेविका दिपाली भालेकर तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे व अमोल टेंबकर लाभले होते. सत्कारमूर्ती सेवानिवृत्त डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांच्या हस्ते झाला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ दुर्भाटकर यांच्या हस्ते झाला.यावेळी पत्रकार अभिमन्यू लोंढे व सोशल मीडियाचे पत्रकार अमोल टेंबकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते मोहन राऊळ, बाळू सावंत, मनवेल डिसूजा, संजय साळगावकर, तुकाराम कासार, राजा सांगेलकर, सुनील गावडे, उदय भराडी, मुकेश पटेल, रूपाली मुधळे हेलन निबरे मंगेश पडते सुरेश ठाकूर संतोष सातार्डेकर व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. 

डॉक्टर दुर्भाटकर यांनी राजा शिवाजी मित्र मंडळाच्या या उपक्रमांचे तोंड भरून कौतुक केले. तसेच पालक वर्ग ही या उपक्रमाने भारावून गेले होते अशा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी जाधव यांनी केले.