
दापोली : मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मनसेचे फायरब्रँड नेते वैभव खेडेकर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त असून याबाबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैभव खेडेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असल्याचेही पुढे आले आहे.
गेली अनेक वर्ष मनसेमध्ये राहून मनसे म्हणजेच वैभव खेडेकर अशी ओळख निर्माण केलेले वैभव खेडेकर यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान वैभव खेडेकर यांनी एक गाण स्टेटस ला ठेवलं असून उदय होगा किरण आज नाही उद्या आपला उदय होणारच आहे हे सांगत त्यांनी एक गाणं स्टेटसला ठेवले आहे. त्यामुळे आता वैभव खेडेकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
वैभव खेडेकर हे एकटेच भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत तर ते त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. पुढे आता कोकणात आता मनसेला खिंडार पडणार आहे.