
सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी गवळी तिठा इथं मनसैनिकांनी त्यांच जंगी स्वागत केलं. यानंतर राज ठाकरेंचा ताफा निघाला मनसेच्या शाखेच्या दिशेने. मोती तलाव काठावरून सालईवाडा इथं असणाऱ्या शाखेकडे हा ताफा रवाना झाला. यावेळी सावंतवाडीत येणाऱ्यांना प्रेमात पाडणाऱ्या सावंतवाडीच हृदय मोती तलावानं राज ठाकरेंना सुद्धा भुरळ घातली. मनसेच्या शाखेत येताच माजी आमदार मनसे नेते परशुराम उपरकर, शहरप्रमुख आशिष सुभेदार यांना राज ठाकरेंनी आल्या आल्या प्रश्न केला. ''तो सावंतवाडीचा मोती तलाव आहे, तिथ रेट काय सुरु आहे ? मध्यवर्ती ठिकाण ते आहे, मनसेच कार्यालय तिथे सुरू केलं तर बसणार का कार्यालयात ? असा सवाल त्यांनी केला. तर ही शाखा चांगली आहे. पण, मोती तलाव काठचा परिसर नजरेत येतो' असं राज ठाकरे म्हणाले.
मनसैनिकांच स्वागत स्वीकारत ते पुढील दौऱ्यास रवाना झाले. दरम्यान, आजच भाजपच्या भव्य कार्यालयाचं उद्घाटन मोती तलावा काठच्या परिसरात करण्यात आली. अजूनही काही पक्षांच्या नेत्यांची संपर्क कार्यालय याच परीसरात आहे. सुंदरवाडी अर्थात सावंतवाडीच मोती तलाव आणि शहराच सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालत. आज राज ठाकरेंना देखील या सुंदर शहरानं आपल्या प्रेमात पाडल.