'रेझिंग डे' सप्ताह ; 8 जानेवारीला सावंतवाडीच्या गार्डनमध्ये प्रदर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2025 18:38 PM
views 85  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून उद्या 8 जाने. 2025 रोजी सकाळी 10:00 वा. ते सायं 07:00 वा. या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 'रेझिंग डे' सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस दलाची व पोलिसांच्या कामकाजाची नागरिकांना माहिती होण्याकरिता सावंतवाडी येथील जगन्नाथ भोसले उद्यान येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. 


या प्रदर्शनामध्ये श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर गुन्हे सुरक्षा, अग्निशस्त्रे, फॉरेन्सिक युनिट, महिला सहाय्य, वाहतूक नियमन व नियंत्रण, पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थी यांनी भेट देऊन प्रदर्शनातून माहिती घेण्याचे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.