
मालवण : मालवणात मुसळधार पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर शहरात संकल भागात पाणी साचले होते. हवामान विभागानेही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली.
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मालवणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागानेही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली. या पावसाचा मळ्यातील शेतीला फटका बसला असून शेती पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. मालवण तालुक्यातील अनेक सकल भागात पाणी साचले होते. शहरात बस स्थानक परिसर, भंडारी हायस्कुल रोड, बाजारपेठेत पाणी साचले होते. यावर्षी गटार खोदाई व्यवस्थित न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.