दोडामार्ग शिवसेनेच्यावतीने व्यापाऱ्यांना पावसाळी छत्र्याचे वाटप

Edited by: ब्युरो
Published on: July 05, 2023 20:51 PM
views 56  views

साटेली भेडशी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माद्यमातून तालुक्यातील फळे व भाजी विक्रेते यांना पावसाळी व्यवसायिक छत्रीचे वाटप करण्यात आले.   

पावसाळा सुरु झाला कि तालुक्यातील दोडामार्ग व साटेली भेडशी बाजारपेठेतील रस्त्यालगत भाजी व फळे विकणारे विक्रेते यांची पावसामुळे कित्येकदा मालाचे नुकसान होते. याचमुळे या विक्रेत्याना पावसात काहीसा आधार व्हावा यासाठी दोडामार्ग शिवसेनेच्यावतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माद्यमातून दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग, झरेबाबर, साटेली भेडशी या प्रमुख बाजारपेठेतील फळे व भाजी विक्रेते यांना पावसाळी छत्री चे वाटप करण्यात आले.

    यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्व्यक शैलेश दळवी, उपजिल्हा प्रमुख तुकाराम बर्डे, उपतालुकाप्रमुख दादा देसाई, तिलकांचन गवस युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, महिला तालुका प्रमुख सॊ. चेतना गडेकर, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, नंदू गावकर आदी उपस्थित होते.