
कुडाळ : नारूर गावासह नजीकच्या डोंगर परिसरात ढग फुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने हातेरी नदीवर मुख्य रस्त्याला लागून असलेल सरनोबात वाडी व देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणारा पूल वाहून गेले आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैसोगर सोय होणार आहे. रांगणागड परिसरात संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. महालक्ष्मी मंदिरा नजीक देऊळवाडी नजीक असलेल पुलावर सुद्धा पाणी आल्याने धनगरवाडी बाजारवाडी रस्ता जलमय झाल्याने होता यामुळे या दोन वाड्यांशी काही काळापुरता संपर्क तुटला होता. नारुर गावासह डोंगर परिसरात ढग सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा अद्याप तरी प्रशासकीय अधिकारी गावात दाखल झाले नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.