
सावंतवाडी : सावंतवाडी शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. गेले दोन दिवस तुरळक प्रमाणात पडणारा पाऊस आज ढगांच्या गडगडाटासह पडला. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पावसानं हजेरी लावली.
अकाली पावसाच्या आगमनाने डिसेंबर महिन्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. मुसळधार पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. या अवकाळीमुळे शेतकरी व बागायतदारांच मोठं नुकसान झालं आहे. तसेच लगीनसराई सुरु असल्याने विवाह सोहळ्यात पावसाचा मोठा व्यत्यय आला.