
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रूद्रप्रयागमध्ये भूस्खलन होऊन चार नेपाळी श्रमिकांचा मृत्यू झाला, तर हरिद्वारमध्ये एक जण गंगा नदीत वाहून गेला.
मुसळधार पावसाने अनेक नद्या दुधडी भरून वाहत आहेत. पाथरी राऊ नदीचे पाणी ७० घरांमध्ये घुसल्याने तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. पुरामुळे नदीपात्राच्या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तेहरी जिल्ह्यातील बाणगंगा भागात मुसळधार पावसामुळे काही घरांची पडझड झाली.