
कणकवली : कणकवली मध्ये गुरूवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने कणकवली तालुक्यात काही ठिकाणी पडझड झाली. यात काही घरांचे देखील नुकसान झाले आहे.
रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने साकेडी - बौद्धवाडी येथे विजीन गोविंद जाधव यांच्या जुन्या घरावर झाड कोसळून घराचे नुकसान झाले. यात घराचे छप्पर व भिंती सह अन्य साहित्याचे देखील नुकसान झाले आहे.