बोगस रेल्वे भरती फसवणूक प्रकरण ; रत्नु कांबळे निर्दोष

ॲड. विलास परब यांचा युक्तिवाद
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 14, 2022 19:12 PM
views 239  views

कणकवली : २०११ मध्ये कणकवली सिध्दार्थ नगर येथील रत्नु कांबळे याने आपण रेल्वे अधिकारी सायली शिंदे यांच्या वाहनावर चालक असल्याचे भासवून रेल्वेत नोकरीस लावतो असे सांगून सुमारे दहा ते अकरा जणांकडून एकूण आठरा लाख रुपये स्विकारून सायली शिंदे यांच्या नावाची नेमणूक पत्रे देऊन उमेदवारांची फसवणूक केली होती. या खटल्यातून कणकवली न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.

यावेळी सादर केलेल्या पुराव्यामध्ये कांबळे हा सफाई कामगार व ट्रँक्टरवर ड्रायव्हर होता. एक सफाई कामगार इतक्या सुशिक्षित उमेदवारांची इंग्रजी भाषेत नियुक्ती पत्रे देणे पटणारे नाही. असाही बचाव आरोपीचे वकील  ॲड. विलास परब यांनी न्यायालयात केला होता.


काय आहे प्रकरण ? 

 कणकवली येथील रहिवासी प्रणय केतकर, मिथुन ठाणेकर, चिंतामणी पेडणेकर, यांच्यासह अन्य काहींना आपण रेल्वेत टि.सी म्हणून नोकरीस आहोत, सायली शिंदे रेल्वे अधिकारी आपल्या खास असून लोको पायलटची भरती सुरू असून तुम्हाला नोकरी हवी आसल्यास पैसे द्यावे लागतील असे सांगून प्रत्येकाकडून एक लाख  ते तिन लाख रुपये  अशा रकमा स्विकारल्या. त्यांच्याकडून रेल्वे भरतीचे अर्ज भरून  घेतले. त्यातील काही जणाना रेल्वेच्या लेटर हेडवर नेमणूक पत्रे दिली. व कामावर हजर राहणेच्या तारखा दिल्या. काही जणाना पोमेंडी बोगदा, रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या नोंदी ठेवण्याचे कामही मिळाले. त्यानुसार काहीजण कामही करत होते. मात्र राजापूर येथे असाच प्रकार उघड झाल्याने रत्नु यास राजापुरात आटकेची बातमी समजल्यानंतर येथील उमेदवाराना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कणकवली पोलीस स्टेशनवर धाव घेऊन फिर्याद दिली. कांबळे विरूद्ध भादवि कलम 415, 420, 465,468,471 , 170 नुसार गुन्हा दाखल होऊन तात्कालिन पोलीस अधिकारी शिगवन यानी अटक करुन दोषा रोप  पत्र दाखल केले.

कोर्टात काय घडलं ? 

  खटल्याच्या कामी प्रणय केतकर, ठाणेकर, सापळे. पंच, सायली शिंदे , तपासिक अंमलदार शिघवण व इतर साक्षीदार  यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आरोपीच्या वकीलानी या प्रकरणात रेल्वे अधिकारी सामील असून त्यांची चौकशी न करणे, सायली शिंदे यांच्या नियुक्ती पत्रावरील सह्या हस्ताक्षर तज्ञाकडे न पाठविणे, कांबळे यास रेल्वे खात्याच्या वरद हस्ताने सहज कुठेही प्रवेश असणे, लेटर हेड लखोटे या मालमत्ता रेल्वेच्या ताब्यात असताना त्या बाहेर जाणे त्यामुळे रेल्वे कर्मचारी यात असण्याची शक्यता बळावते, काही उमेदवार बिनदिक्कत नोकरी करीत होते., हे कसे शक्य आहे, कांबळे यास बळीचा बकरा करुन करते करविते नामानिराळे राहीले, नेमणूक पत्र आरोपीनेच दिले याबाबत ठोस पुरावा नसणे, पोलीसानी रेल्वे अधिकारी यांची चौकशी न करणे, त्याना झुकते माप देणे वगैरे असंख्य बाबी आरोपीच्या वकीलानी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. सबळ पुराव्या आभावी संशयाचा फायदा देऊन न्या. शेख यानी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. विलास परब, ॲड तुषार परब, ॲड. भालचंद्र पाटील , ॲड मेघना सावंत, ॲड. प्रियांका परब यानी काम पाहीले.