...तर भीक मांगो आंदोलन ; रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 26, 2025 16:13 PM
views 335  views

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांतील समस्यांच्या पाहणी करण्यासाठी व रेल्वे प्रवासी संघटनेशी चर्चा करण्यासाठी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक मधुकर मातोंडकर, इंजिनिअर जेपीप्रकाश, एरिया सुपरव्हायझर विजय पालव हे कणकवली रेल्वे स्थानकात शनिवारी आले होते. त्यांनी स्थानकातील समस्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्यासमोर रेल्वे स्थानकांमधील समस्यांचा पाढाच वाचला. यावर समस्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन श्री. मातोंडकर यांनी दिले. १ आॅगस्टपूर्वी सिंधुदुर्ग हद्दीतील रेल्वे स्थानकांतील समस्या मार्गी न लागल्यास १५ आॅगस्ट रोजी भीक मांगो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सुरेश सावंत यांनी दिला.

मधुकर मातोंडकर,जेपीप्रकाश, विजय पालव यांनी कणकवली रेल्वे स्थानक परिसरातील समस्यांची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांना फ्लॅटफार्मलगत रान वाढल्याचे दिसून आले. अपुºया शेड अभावी प्रवाशांना पावसात भिजत रहावे लागते, रेल्वे स्थानक परिसरात फंख्ये नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते, प्रवाशांसाठी बसण्यासाठी असलेल्या शेडच्या छप्परला गळती लागल्याने आसन व्यवस्थेवर पाणी असते, त्याठिकाणी रान वाढल्याने प्रवाशांना बसता येत नाही यासह अन्य समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाºयांशी चर्चा केली. पदाधिकाºयांनी त्यांच्यासमोर रेल्वे स्थानक परिसरातील समस्यांचा पाढा वाचला. यावर फ्लॅटफार्मवर वाढलेले रान कापण्याचे काम लवकर हाती घेणार आहोत, फंखे बसविणार आहोत, सध्या स्थितीत कणकवली रेल्वे स्थानकात एक नंबर फ्लॅटफार्मवर १५० मीटर लांबीचे छत आहे. मात्र, दुसºया फ्लॅटफार्मवर २०० मीटर छत बांधण्यास मंजूरी मिळाली आहे. हे छत उभारणीचे काम लवकर हाती घेतले जाईल. तसेच रेल्वे स्थानकात उतरता जिना बसविण्याचे काम लवकर सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

कणकवली रेल्वे स्थानक परिसरातील फ्लॅटफार्मवर शेवाळ आणि पाणी साचत असल्याने प्रवाशी पडण्याचे प्रकार वारंवार घडतात, प्रवाशांच्या तुलनेत स्वच्छतागृहे अपुरी पडत आहेत, स्वच्छतागृहाची मध्ये स्वच्छता नसते, तिकिट घरे कमी आहेत, छताला गळती लागली आहे यासह अन्य समस्या सुरेश सावंत, संजय मालंडकर, उमेश वाळके यांनी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रवाशांनी अधिकाºयांना काही प्रश्नही विचारले. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संतोष सावंत, महेश कदम, संतोष राणे यांच्यासह रेल्वे प्रवाशी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, अधिकाºयांच्या टीमने खारेपाटण, नांदगाव रेल्वे स्थानकाची पाहणी केली. रेल्वे स्थानकातील समस्यांबाबत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल पालकमंत्री व जिल्हाधिकाºयांनी यांनी घेत रेल्वे स्थानकांतील समस्यांचा पाहणी करण्याची सूचना कोकण रेल्वे प्रशासनाला केली होती. त्यानुसार रेल्वेच्या अधिकाºयांची टीम कणकवली दाखल झाली होती.