रेल्वे प्रवासी संघटनेच्या उपोषणाला शरद पवार गटाचा पाठिंबा !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 13:28 PM
views 189  views

सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील पाठिंबा आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी  यांनी दिली.

सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आदी मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा प्रवासी संघटनेच्या माध्यमातून दिलाय. त्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. सर्व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन दळवी यांनी केले.