रेल्वे आमच्या हक्काची...! | सावंतवाडीकरांचा एल्गार !

लाक्षणिक उपोषणास हजारोंचा पाठिंबा
Edited by: विनायक गावस
Published on: January 27, 2024 05:50 AM
views 198  views

सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आलं. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईसह विविध संघटनांसह सावंतवाडी, वेंगुर्ला भागातील मोठ्या संख्येने लोकांनी यामध्ये सहभागी होत या उपोषणाला आपला पाठिंबा दिला. स्व.मधू दंडवतेंना वंदन करून या लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली. रेल्वे स्थानकाबाहेर हे उपोषण छेडण्यात आले. यावेळी शेकडोंच्या उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. 

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस मंजूर झाले असून दोन टप्प्यांमध्ये या टर्मिनसचा विकास होणार होता. पहिल्या टप्प्याचा निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला. तर दुसऱ्या टप्प्याचा निधी परत घेण्यात आला. तो देऊन टर्मिनस जलद गतीने हे काम व्हावे अशी आमची मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या टर्मिनसचे आठ वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले होते. ते पुर्णत्वास आलं पाहिजे असं मत व्यक्त केल. तर सचिव मिहीर मठकर यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एक्स्प्रेस गाड्यांना सावंतवाडी स्थानकावर थांबा मिळावा, कोकण रेल्वेच्या प्रमुखांनी आंदोलनाची दखल घेतली असली तरी मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने हे आंदोलन कराव लागल. त्याचप्रमाणे प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी टर्मिनसचे नामकरण करण्याबाबत आमची मागणी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, सावंतवाडीकरांच्या हक्काची रेल्वे आहे‌. यासाठी माजी आमदार जयानंद मठकर, डी.के.सावंत यांसह सावंतवाडीकरांनी योगदान दिलं आहे‌. आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. त्यामुळे कोकण रेल्वे व सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस उभारणी  एका टप्प्याच काम पूर्ण झालेले असताना दुसऱ्या टप्प्याच काम निधी अभावी रखडलं आहे‌‌. लोकांची फसवणूक करण्याच काम स्थानिक आमदारांकडून केलं जातं आहे अशी टीका त्यांनी केली. तर रेल्वे रोको पेक्षा जिल्ह्यातील मंत्र्यांची गाड्या रोखा असं विधान माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी केल. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे शांताराम नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर,  प्रवासी संघटनेचे राजू कांबळे, सुनील उतेकर,कमलताई परूळेकर, युसुफ आर्ते, अँड देवदत्त परूळेकर, रमेश बोंद्रे, अभिमन्यू लोंढे, अँड नकुल पार्सेकर सागर तळवडेकर,सागर नाणोसकर,सिमा मठकर,आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील गावांचे सरपंच यांसह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. रेल्वे टर्मिनस पूर्ण झालच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष शांताराम नाईक, प्रमुख राजू कांबळे, संजय सावंत, रुपेश दर्गे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, श्वेता शिरोडकर, अण्णा केसरकर, यशवंत जडयार, प्रमोद गावडे,अभिमन्यू लोंढे, शेखर पाडगांवकर, भाई देऊलकर, महेश परूळेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, अँड. नकुल पार्सेकर, सागर नाणोसकर, सागर तळवडेकर, भुषण बांदिवडेकर, रविंद्र ओगले, प्रमोद गावडे,विहंग गोठोस्कर, देव्या सुर्याजी, वजराठ ग्राम पंचायत सरपंच अन्यण्या पुराणिक, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, दीपेश परब,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नेमळे सरपंच.सौ भैरे,,निरवडे सरपंच.सुहानी गावडे आरोंदा उपसरपंच ,मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, गुरू गावकर, श्री तानावडे,किरण मातोंडकर, समीर मातोंडकर, राधा तळवडेकर, सुधीर राऊळ, हिदायतुल्ला खान, निलेश कुडव, स्नेहल जामदार, सुधीर पराडकर, सीमा मठकर, कल्पना बांदेकर, सायली दुभाषी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, बाळा गावडे, सिद्धेश सावंत, विनायक गांवस, राज पवार, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, सुरेश गावडे,  गुणाजी गावडे, गुरुप्रसाद गवंडे, समीर वंजारी, रफिक मेमन,मुंबईतून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे शेखर बागवे,बाळ वेळकर,दिपक चव्हाण,सुभाष लाड,श्रीकांत सावंत,अभिषेक अनंत शिंदे,राजाराम कुंडेकर,सुरेंद्र पवार,प्रशिल लाड,अतुल चव्हाण,अशोक देवरूखकर,संदेश लाड,पराग लाड,संजना पालव,मनोज पिंपळकर,रंजन पाळेकर, शेखर पाडगावकर, प्रमोद गावडे, चंद्रकांत कासार,बाळा गावडे,वसंत धुरी, जगन्नाथ पंडित, उदय पारीपत्ते, शांताराम (बाबू) पंडित, शिवराम पंडित आदी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले होते. 

कोकण रेल्वे प्रशासनावर तीव्र संताप !

दरम्यान, कोंकण रेलवे कॉपर्पोरेशन लि. रत्नागिरीचे  क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रविंद्र कांबळे यांच पत्र घेऊन कोकण रेल्वेचे कणकवली येथील अधिकारी घनश्याम उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी रेल्वे प्रशासनान दिलेलं हे पत्र म्हणजे प्रवाशांची केवळ फसवणूक करण्याचा प्रकार आहे. आमच्या मागण्यांबाबत यात कोणतीही स्पष्टता नाही. यात सूरु असणाऱ्या रेल्वे गाड्यांचीच माहिती आहे. आमच्या इतर मागण्या तुमच्या अधिकारात नाही तर हे पत्र घेऊन तरी का आलात ? रेल्वे प्रशासन आम्हाला मुर्ख समजत का ? असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला. तर लाक्षणिक उपोषण करत आहोत असं पत्रात नमुद केलेल असताना २६ जानेवारी  चे 'रेल रोको' आंदोलन मागे घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाला सहकार्य करा असं म्हटलंच कसं जातं. 'रेल रोको'चा उल्लेख रेल्वे प्रशासनानं केलाच कसा ? असा सवाल करत प्रशासना विरूद्ध तीव्र संताप उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. हा प्रवाशांचा अपमान आहे अशी भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.