
कणकवली : कणकवली शहरातील परबवाडी येथील संदीप रमेश सरंगले (४६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. परबवाडीतील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. संदीप यांचा मनमिळावू व हसतमुख स्वभाव होता.
त्यांच्या पश्चता आई, वडील, पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, भावजया, बहीण असा मोठा परिवार आहे. कोकण रेल्वेचे कर्मचारी सचिन सरंगले यांचे ते चुलत बंधू होत.