
Raigad Accident Breaking : रायगड - माणगाव च्या रेपोली येथील अपघातात बचावलेल्या 5 वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झालाय. भव्य निलेश पंडित असे मृत मुलाचे नाव आहे. उपचारासाठी मुंबईत नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा 10 वर पोहोचलाय.
आज पहाटे 5 वाजता मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला होता. भरधाव ट्रकची इको कारला धडक बसून त्यात 9 जण जागीच ठार झाले होते. तर आता उपचारासाठी जाताना वाटेत 5 वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाल्याने हा आकडा आता 10 वर पोहोचलाय. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील हेदवी इथ निघाले होते.