
देवगड : देवगड येथील पोयरे मसवीवाडी येथे पोलिसांनी एका घरावर छापा टाकून सुमारे 2 लाख 68 हजार रूपयाची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे .गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे, बिनापरवाना बाळगल्याप्रकरणी तेथिलच योगेश विलास मयेकर(41) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता केली.
याबाबत पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी दुपारी पोलिसांनी पोयरे मसवीवाडी येथील योगेश विलास मयेकर याच्या घरामध्ये छापा टाकून घरात ठेवलेली 2 लाख 68 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली.यामध्ये 34 बॉक्स 1632 बॉटल किंमत 1 लाख 63 हजार रूपये , 960 बॉटल किंमत 96 हजार, 48 बॉटल किंमत 4800 व 10 बॉटल 4 हजार रूपये असा एकूण 2 लाख 68 हजार रूपये किंमतीचा गोवा बनावट दारूचा मुद्देमाल सापडला.
ही कारवाई पोलिस निरिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव, म.पो.कॉ.अमृता बोराडे, पो.कॉ.निलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, विश्वनाथ पाटील, योगेश महाले यांनी केली.गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे व बिगरपरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी योगेश विलास मयेकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.