
सिंधुदुर्ग : भारत जोडो यात्रेमध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला कॉंग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून हि यात्रा सुरु झाल्यापासून त्या ह्या यात्रेत सहभागी झाल्यात. या दरम्यान, त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. हा फोटो सोशल मिडीयावर शेअर करत त्या म्हणाल्या, भारत जोडो यात्रे मध्ये राहुलजी गांधी यांच्या बरोबर अविस्मरणीय अशी भेट झाली. स्वातंत्र लढ्यात माझे आजोबा बापूजींं बरोबर दांडी यात्रेत आणी आता मी राहुलजीं बरोबर ...असा दुर्मिळ योगयोग्..! तसेच महिला संघटनबाबत चर्चा झाली. 13 दिवस 236 किमीचा माझा प्रवास आणी "शेगाव" मध्ये कदाचित गजानन महाराज परीक्षा बघत होते. भारत जोडो महाराष्ट्र संपता संपता भेट आणी ती सुद्धा काँग्रेस पदाधिकारी म्हणून भक्ती शिवाय ईश्वर भेटत नाही हेच खर .""Dynamic and stubborn लेडी"" राहुलजीचे शब्द मी खूप भारवून गेली. ऑल इंडिया अध्यक्षा नेता डीसोज़ा आणी संध्याताई महिला प्रदेश् अध्यक्षा याच्यामुळे मी राहुलजी ना भेटू शकली .धन्यवाद नाना भाऊ पाटोले, प्रणिती ताई शिंदे I feel very proud'' अशी पोस्ट त्यांनी शेअर केलीय.