राहुल गांधी राजकारण कमी आणि लोकांच्या हितासाठी जास्त भांडतात : अजिंक्य देसाई

Edited by:
Published on: May 04, 2024 08:47 AM
views 89  views

दोडामार्ग :  इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी यांचे ब्रीदवाक्य "मोहब्बत  की दुकान" ज्यात कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केला जाणार नाही. त्यासाठी त्यांनी प्रत्येक राज्यात प्रदेशाध्यक्ष नेमलेले आहेत. मागच्या दहा वर्षात भाजपकडून चुकीच्या गोष्टी घडत आहेत. भाजप आणि मोदी यांच्यातील नेतृत्व हलल आहे. मोदींना वाटतं की आपण कुठेतरी चुकत आहे. म्हणून त्यांची भाषा थोडी सोम्य झाली आहे. त्यांची आता माणुसकीची वक्तव्ये बाहेर पडायला लागली आहेत. राहुल गांधी हे राजकारण थोड व लोकांच्या हितासाठी जास्त भांडत आहेत. ते देशातील लोकांच्या बाजूने ठामपणे उभे असून रोजगार, आरोग्य, शिक्षण या गोष्टी प्रबळ करणार आहेत. त्यामुळे येथील मतदार सुज्ञ असल्याने आपल्या मतदानाचा योग्य वापर करून इंडिया आघाडीला निवडून देणार आहे. अशी माहिती काँग्रेस जिल्हा प्रभारी निरीक्षक अजिंक्य देसाई यांनी दिली. 

दोडामार्ग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेस जील्ह्याध्यक्ष इर्शाद शेख, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, बाळा धाऊसस्कर, सुभाष दळवी व कार्यकर्ते उपस्थित होते. देसाई म्हणाले काँग्रेसने तयार केलेला जाहीरनामा हा कुठल्यातरी एसी रूम मध्ये बसून तयार केलेला नाही. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत तसेच मणिपूर ते मुंबई पर्यंत भारत जोडो पदयात्रा यात्रा केली. या यात्रेत त्यांनी बऱ्याच युवकांशी, व्यापाऱ्यांशी, शेतकऱ्यांशी, महिलांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा काय आहेत. सरकारकडून त्यांना नेमके काय हवे आहे हे जाणून घेतले. आणि, देशातील जनतेला अभिप्रेत असा जाहीरनामा काँग्रेस पक्षाने तयार केलेला आहे. परंतु, काँग्रेसने आखलेल्या या जाहीरनाम्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकीचा अपप्रचार करीत आहेत. जाहीरनाम्यात दिलेले नाही ते काँग्रेस पक्ष करणार आहे अशी अफवा पंतप्रधान नरेंद्र मोदी पसरवत आहेत. देशाचे सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने धडधडीत खोटं बोलू नये.

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात देशातील जनतेला पाच प्रकारचे वचने दिलेली आहेत. शेतकरी न्याय, युवा न्याय, महिला न्याय, भागीदारी न्याय, कामगार न्याय अशी वचने आहेत. शेतकरी न्यायाच्या माध्यमातून स्वामीनाथन आयोगाची शिफारशी लागू करणार आहे. जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या मालाचा आधारभूत मोबदला मिळेल. शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीचा खर्च दुप्पट वाढवून ठेवला आहे. शेतकऱ्यांच्या अवजारांवर, बिबियाणांवर, खतांवर, औषधांवर जीएसटी लावून त्याची रक्कम भरमसाठ वाढवून ठेवलेली आहे. काँग्रेसची सत्ता होती तेव्हा या सर्वांवर सबसिडी दिली जात होती. मात्र, ती सबसिडी मोदी सरकारने बंद केली आणि जीएसटी कर लादून शेतकऱ्याला देशोधडीला लावलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसने हा विषय हाती घेतला आहे. अर्थमंत्री सीतारामनयांनी सांगितले आहे की, गेल्या दहा वर्षात आम्ही शेतकऱ्याचा एकही रुपये कर्ज माफ केलेला नाही. महाविकास आघाडीच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली होती तीच कर्जमाफी फक्त शेतकऱ्यांना मिळाली आहे. या पुढे काँग्रेस कर्जमाफी करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी आयोग स्थापन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. त्यामुळे जनतेनं काँग्रेसच्या जहिरनाम्याचा बारकाईन अभ्यास करून इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करावं असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केलं आहे.