
सावंतवाडी : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांसाठी आवश्यक असणारे आयुष्यमान भारत कार्ड बनविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख यांच्या माध्यमातून सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे आरोग्य कार्यशाळेच आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्था व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच सहकार्य लाभलं.
अनेकांनी या कार्यशाळेत सहभागी होत आयुष्यमान भारत कार्ड बनवल. ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. रफिक शेख यांच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांसाठी देखील सामाजिक उपक्रम राबविला होता. त्यानंतर नाट्यमय घडामोडी शहरात घडल्यानंतर देखील त्यांनी सामाजिक कार्य कायम ठेवल आहे.