
कणकवली : कणकवली सारख्या छोट्या शहरात बेकरीजन्य पदार्थाचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करणे ही आर. बी. बेकरीची खासियत आहे. मागील ५० वर्षात आर. बी. बेकरीची उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. याचमुळे आता केक्स व कॅफेची ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आर. बी. बेकरीने आपल्या तिसऱ्या शाखेचा आर बी कॅफे या टॅग लाईन खाली हे दर्जेदार असे दालन सुरु केले आहे. याचा शुभारंभ रजित्रन कंडीयन यांच्या वडिलांच्या म्हणजेच बाळकृष्ण पी. यांच्या हस्ते आज शनिवारी सकाळी विविध क्षेत्रातील मंडळीच्या उपस्थितीत पार पडला.
मुंबई सारख्या मोठ्या महानगरांमध्ये केक्स व कॅफेचा नवा टेड सुरु असून त्याला नव्या पिढीचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातही हा टेड रुजू होऊ लागला आहे. ही गरज लक्षात घेऊन आर बी कॅफे सुरु केला आहे. विविध नाविन्यपूर्ण यंत्रसामुग्रीसह, सुख सोयींच्या दृष्टीने हा कॅफे वेगळेपण जपणारा असाच आहे. या कॅफेमध्ये शोर्मा, बर्गर, सॅडविज, भेल, पाणीपुरी, केक, वाढदिवसासाठी लागणारे साहित्य, ज्यूस, कॉकटेल, आईस्क्रीम, बेकरीजन्य पदार्थ यांच्यासह नावीन्यपूर्ण अशा व कणकवलीकरांसाठी मनपसंत असे स्वादिष्ट व चविष्ट पदार्थ यामुळे चाखता येणार आहेत.
रजित्रन कंडीयन,रथिष कंडीयन रोनिक रजित्रन,मुकुंद किनाती. शिमी पी, भाऊ गावडे यांच्यासह महापुरुष मित्र मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान सकाळच्या सत्रात नीलम ताई राणे, आम.नितेश राणे, मनसेचे नेते परशुराम उपरकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री,राजू गवाणकर, गौरव गवाणकर, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, उद्योजक राजू मानकर,विजय पारकर, हरीष उचले, प्रथमेश चव्हाण,अशोक पुजारी,सुशील पारकर,प्रद्युम मुंज,सावी लोके,गुरू काळसेकर, आचरेकर प्रतिष्ठानच्या सदस्या लीना काळसेकर,विठ्ठल देसाई,वैभव काणेकर, बंडू खोत, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष राजन पारकर, प्रसन्ना देसाई विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक व व्यापारी वर्गातील सहकारी मित्रांनी भेट देत शुभेच्छा दिल्यात. ज्यांनी या व्यवसायाची मूर्तमेढ कणकवली सारख्या शहरात रोवली असे ज्येष्ठ उद्योजक पी. बाळकृष्ण यांचा सत्कार महापुरुष मित्र मंडळाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
नीलम ताईंचे आशीर्वाद
आपल्या शहरात असे दालन सुरू झाले याचा अभिमान. वेगळेपण जपणारी आर.बी.केक्स अँड कॅफे जनतेच्या पसंतीस उतरेल. वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट अनुभवता येणार हे कणकवली वासीयांचे भाग्यच अशा गौरउद्गारात या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा देत आशीर्वाद देखील दिले.
आम. नितेश राणेंच्या शुभेच्छा...
आ. नितेश राणे यांनी या कॅफेला भेट देताना तरुण युवक- युवतींसह कणकवली वासियांना मुंबईच्या धर्तीवर दालन उभे करून दिल्याबद्दल कौतुक केले. आ.र.बी. बेकरीच्या केक व इतर प्रोडक्शन संदर्भात एक विश्वासार्था जनतेच्या मनात निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी या नवीन व्यवसायास शुभेच्छा दिल्या.