अभियंता विनोद पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती | वीज ग्राहक आक्रमक

Edited by:
Published on: May 30, 2024 10:16 AM
views 442  views

सावंतवाडी : वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे व ससतच्या मनुष्य व वित्त हानी मुळे संतप्त झालेल्या सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील वीज ग्राहकांनी अभियंता विनोद पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत चांगलीच खरडपट्टी काढली. अधिकारी वर्गांच्या चुकांमुळे प्रचंड मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे  मनुष्य व वित्त हानीस येथील  नागरिकांना सहन करावे लागत आहे. याचा सर्वपक्षीयांनी एकत्रित येत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. कर्तव्याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना करून दिली. तर प्रिपेड मिटरला देखील विरोध दर्शविला. 

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय नेतेमंडळी यांनी  सावंतवाडी वीज कार्यालयात धडक दिली. यावेळी सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातून बहुसंख्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पदाधिकारी जमले होते. प्रारंभी वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त करत आक्रमकपणे वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यानंतर शहरातील मँगो हॉटेलच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी विविध भागातून आलेल्या नागरिकांनी व  सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला चांगलेच धार्‍यावर धरत आपल्या समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. या सभेचे इतिवृत्त लिहून त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी  उपस्थित सर्वजण आग्रह करत होते. 

माजी आमदार राजन तेली यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. सरकारकडून सर्व गोष्टी पूरविल्या जात असाताना केवळ अधिकारी वर्गांच्या चुकांमुळे या गोष्टी घडत असल्याचे ते म्हणाले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील वारंवार मनुष्य हानीसह कारणीभूत ठरणाऱ्या वीज खांबांकडे लक्ष वेधलं. तर प्रिपेड मिटरला देखील विरोध दर्शविला. जर प्रिपेड मिटर लावले तर शासन उधळवून लावायची ताकद ग्राहकांत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विशाल परब यांच्यासह उपस्थितांनी वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांच लक्ष वेधलं. दरम्यान वीज वितरण अधिकाऱ्यांनी यापुढे  विजेच्या संदर्भात असलेल्या समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे उपस्थित त्यांना आश्वासित केले.

यावेळी भाजपा विधानसभा अध्यक्ष राजन तेली, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शेखर गावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, विलास जाधव, सुरेश भोगटे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, माजगाव उपसरपंच बाळू वेझरे, दिलीप भालेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, गुणाजी गावडे, आनंद नेवगी, चंद्रकांत कासार, सावंतवाडी भाजपा मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, संतोष गांवस, बाळा बोर्डेकर, महेश खानोलकर, निलेश मुळीक यांसह आदी शेकडो वीजग्राहक उपस्थित होते.