LIVE UPDATES

नगराध्यक्षांचे आश्वासन कुठे विरले ?

नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 27, 2026 15:42 PM
views 40  views

 सावंतवाडी : पंधरा दिवसात सावंतवाडीतील रस्ते चकाचक करून देण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन कुठे विरले ? असा सवाल शिवसेना नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी केला आहे‌. तर पाऊस आला तरी सावंतवाडीत नळाच्या पाण्याचा दुष्काळ असल्याचीही जोरदार टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, पावसाळ्यात देखील नळाच्या पाण्याचा दुष्काळ शहरात असून पाण्याचे भरमसाठ बील मात्र जनतेच्या माथी मारल जात आहे. शहरातील सालईवाडा शिरोडा नाका ते स्वार दुकानपर्यंत खणलेल्या रस्त्यावर ठेकेदाराने ग्रीट टाकली आहे. त्यावरून सकाळी मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांच्या गाडी घसरत आहेत. रस्त्यावरील मातीमुळे चालणे मुश्कील झाले असून याला जबाबदार कोण ? प्रशासन की ठेकेदार की दोघांवर ही अंकुश ठेवता न येणाऱ्या नगराध्यक्षा ? असा सवाल नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी केला.