
दोडामार्ग : पिकुळे वरचे लाडाचेटेंब येथे फटी गवस यांच्या कोंबड्याच्या खुरड्यात मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता शिरलेल्या भला मोठ्या दहा फुटी अजगराला सरपंच तथा सर्पमित्र आप्पा गवस यांनी मोठ्या शिताफीने पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडले. घरा नजिक च फटी गवस यांनी गावठी कोंबड्या पाळल्या आहेत. या कोंबड्याच्या खुरड्यात भला मोठा अजगर शिरला होता, घरातील एका व्यक्तीला अजगर दिसून आला, तात्काळ सरपंच तथा सर्पमित्र आपा गवस यांना बोलावून घेण्यात आले , या नंतर यांनी अजगराला पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडले .