पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य आत्मसात करा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन
Edited by:
Published on: May 31, 2025 16:54 PM
views 134  views

वेंगुर्ले : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय व परोपकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रशासकीय कामकाज उत्तमरीत्या चालविताना आपल्या प्रांतात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी आणण्यासाठी मोठे काम उभे केले. त्यांचे कर्तुत्व आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती उत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा राष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ला  काथा उद्योग येथे आयोजित कार्यक्रमात श्री नाईक बोलत होते. श्री नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने या कार्यक्रमाच्या शुभारंभ झाला. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पहिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई खोत यांनी पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,प्रदेश चिटणीस एम के गावडे, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई परब, सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर, जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, संदीप राणे मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालडकर, देवगड तालुकाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत, जिल्हा सचिव सुशील चमणकर, जिल्हा सचिव केदार खोत, वेंगुर्ला तालुका महिला अध्यक्ष ऋतुजा शेटकर, प्रविणा खानोलकर, शहराध्यक्षा रंजना निर्मल, प्रियांका शेटकर, संतोष राऊळ, दारीनी देसाई , चंद्रशेखर मांजरेकर, मंजिल शेख, कमल तोडकर, अंजली धुरी, जिल्हा सचिव विलास पावसकर,आदी उपस्थित होते.

श्री नाईक म्हणाले, अहिल्यादेवी यांनी मावळ प्रांतामध्ये 1725 ते 1795 पर्यंत कुशल प्रशासक म्हणून काम केले. महिलांसाठी त्यांनी वेगवेगळी धोरणे राबवत महिला प्रगत कशा होतील यावर भर दिला. अनेक धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार करतानाच सामाजिक कार्य उभे केले.गरीब गरजूंना रोजगार उपलब्ध करून दिला. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला आपण आदरांजली अर्पण करतानाच आपण सर्वांनी यातून बोध घेत त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याची गरज आहे. 

सावळाराम अनावकर म्हणाले, महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे 

एम के गावडे म्हणाले,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेले काम फार मोठे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत आपण सर्वांनी पुढे गेले पाहिजे. 

सुरेश गवस म्हणाले महिलांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या सारखे निर्भीड पणे काम केले पाहिजे. 

प्रज्ञाताई परब म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे कार्य आजही प्रेरणादायी असेच आहे. त्यांनी त्या काळात महिला सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल आदर्शवतच नव्हे तर मोठे धाडसी काम होते. आपण सर्वांनी त्यांचा हा आदर्शवत कामाचा वसा पुढे चालू ठेवला पाहिजे असे सांगितले. 

प्रज्ञाताई परब यांना 2002 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. आज पुरस्कार मिळून त्यांना 23 वर्षे पूर्ण झाली. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने त्यांचा विशेष सन्मानही करण्यात आला.