
देवगड : शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार होऊन त्यात लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेल्या जलरथाने टेंबवली गावाला भेट दिली यावेळी टेंबवली सरपंच हेमंत राणे, टेंबवली ग्रामसेवक हनुमंत तेर्से, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष राणे, सागर घाडी, जितेंद्र जाधव, वानिवडे ग्रामसेविका मनिषा मांडे, पाणी व स्वच्छता समन्वयक विनायक धुरी, पप्पु पारकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
शासनाच्या जल युक्त शिवार , गाळमुत्क धरणगाळ युक्त शिवार या राज्य शासनाच्या तसेच प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना व अटल भुजल योजना या केंद्र शासनाच्या योजना शासनाने गावस्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला असुन या योजनेत गावांनी सहभाग वाढवावा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी केले आहे .
शासनाच्या या योजना गावस्तरावर पोहचवण्यासाठी शासनाच्या वतीने कौटिल्य मल्टिक्रिएशन यांच्या सोबत झालेल्या करारानुसार या योजना जलरथाच्या माध्यमातुन प्रचार प्रसार करण्यात येणार आहे . हा जलरथ गावस्तरावर जाणार असुन या योजनांचे महत्त्व पटवुन देण्यासाठी देवगड तालुक्यात तालुका समन्वयक मयुर खंदारे नेमण्यात आला आहे.