
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी आयोजित सावंतवाडी येथे पहिले जिल्हा साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांच्या 'सोरगत' या दोन अंकी मालवणी नाटकाच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. हे पुस्तक पंडित पब्लिकेशन, कणकवली यांनी प्रकाशित केले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री नीरजा, माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले, कादंबरीकार प्रवीण बांदेकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, सहा. शिक्षण उपसंचालक गणपती कमळकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी व्यासपीठावर श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, पदाधिकारी संदीप निंबाळकर, रमेश बोंद्रे, पंडित पब्लिकेशनचे संपादक वामन पंडित, विक्रांत सावंत, भरत गावडे, शरयू आसोलकर, विठ्ठल कदम, म. ल. देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.










