'मानस'चं वार्षिकांकाचं प्रकाशन..!

Edited by: विनायक गावस
Published on: January 06, 2024 11:25 AM
views 117  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांना कृतीशील बनवण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांमधील लेखन,कला, काव्य आदी साहित्य समृद्ध करून लिहित्या हाताना प्रोत्साहन मिळावे म्हणून या संस्थेमार्फत दरवर्षी 'मानस' हा वार्षिकांक काढला जातो. या वर्षी या अकांचे प्रकाशन 'ताल द रीदम' या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कोकण विभाग महिला प्रमुख मा अर्चना घारे परब, संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही बी नाईक, खजिनदार सी एल नाईक शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संस्थेचे अन्य  पदाधिकारी, माजी शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. 

भारताला अभिमानास्पद वाटावी अशी चांद्रयान मोहीम, स्व .ना . भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्ष तसेच राष्ट्रीय भरड धान्यवर्ष याचे औचित्य साधून चरित्रात्मक आणि माहितीपर लेख, कविता याचा अंतर्भाव त्यात केला आहे.   

एकूणच संस्थेची सर्वांगीण प्रगतीचा आढावा  या अंकातून घेतलेला आहे . चौकुळ हायस्कूल दोडामार्ग हायस्कूल आणि राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी या तिन्ही शाळा आणि ज्युनिअर कॉलेजचा वार्षिकांक 'मानस'हा संस्थेच्या उपक्रमशीलतेमध्ये भर घालणारा ठरणारा आहे.