'रंगवाचा' त्रैमासिकाचं कॅलीफोर्नीयात प्रकाशन

Edited by:
Published on: June 28, 2024 08:16 AM
views 72  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गचे सुपुत्र, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी वामन तथा उदय पंडित यांच्या "रंगवाचा"  त्रैमासिक अंकाचे प्रकाशन 'बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या' संमेलनात कॅलीफोर्नीया येथे करण्यात आले. मनोज वाडेकर यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. वाडेकर हे देखील कळसुलकर शाळेचे विद्यार्थी आहेत. 

'कनक रंगवाचा' या कणकवलीतून प्रकाशित होणाऱ्या आणि पूर्णपणे रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या आठव्या वर्षातील एकंदर ३० व्या अंकाचे प्रकाशन २७ जूनला अमेरिकेत 'सॅन होजे' येथे होत असलेल्या 'बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या' संमेलनात झाले. या अंकात 'अमेरिकेतील मराठी नाट्यअस्मिता' हा विशेष विभाग असून अमेरिकेत मराठी भाषा आणि मराठी नाटक जोपासणाऱ्या ११ रंगकर्मीच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या आहेत. या विभागाचे संपादन मूळ कणकवलीत शिकलेली अमेरिकास्थित मोहना प्रभूदेसाई जोगळेकर हिने केले आहे. हा अंक BMM संमेलनात 'ग्रंथाली' च्या स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.  हा अंक अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी अमित वझे आणि त्यांचे सहकारी तसेच 'ग्रंथाली'चे सुदेश हिंगलासपूरकर, दिपा नाडकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.