'खंबीर सरनोबत हंबीरराव' ग्रंथाचे मंगळवारी प्रकाशन !

Edited by: विनायक गावस
Published on: October 21, 2023 12:00 PM
views 60  views

सावंतवाडी : मर्द मराठा पुस्तक शृंखलेतील भावार्थ मांद्रेकर लिखित 'खंबीर सरनोबत - हंबीरराव.!' या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी श्री भगवती हायस्कूल सभागृह पेडणे (गोवा) येथे होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून लोकायत प्रकाशन संस्था साताराचे प्रकाशक राकेश साळुंखे, उद्योजक तथा समाजसेवक नारायण केरकर, श्री भगवती हायस्कूलचे चेअरमन प्रवीण कोटकर, सुरभी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सांगळे, पत्रकार निलेश मोरजकर, लेखक भावार्थ मांद्रेकर आणि कुटुंबीय तसेच व्यवस्थापक सुरभी संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, शिवराज्य प्रतिष्ठान, मैत्रेय प्रकाशन आदी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


लेखक भावार्थ मांद्रेकर हे न्यू इंग्लिश हायस्कूल केरी - पेडणे (गोवा) येथे मुख्याध्यापक पदावर असून गेली 25 वर्ष ते पत्रकारितेतही सक्रिय आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त आहेत. यापूर्वी त्यांचा 'अद्वितीय रणसंग्राम' हा ग्रंथ प्रकाशित झाला असून 'करवीरचं गाठोडं' हे आगामी पुस्तक देखील प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तरी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन लेखक भावार्थ मांद्रेकर आणि व्यवस्थापक सुरभी, स्वामी विवेकानंद संस्था, शिवराज्य प्रतिष्ठान, मैत्रेय प्रकाशन यांनी केले आहे.