
सावंतवाडी - आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या पंचविसाव्या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राथमिक शाळेतील आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री ईश्वर हणमंतराव थडके यांच्या भाव अंतरीचे या काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी माध्यमिक शिक्षक आत्माराम बागलकर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका श्रीम. वृंदा कांबळी, ज्येष्ठ साहित्यिक तथा विनोदी लेखक ससुलीकार मधुकर घारपुरे, ज्येष्ठ साहित्य अभ्यासक कवी सुधाकर ठाकूर, गोव्याचे साहित्य संगम अध्यक्ष श्री गजानन मांद्रेकर अश्या प्रसिद्ध लेखक,साहित्यिकांच्या हस्ते काव्यासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
माझ्या काव्य लेखनात साहित्य प्रेरणा कट्ट्याचा मोठा वाटा आहे यांच्या मुळेच मला साहित्य वाचनाची व लिहिण्याची प्रेरणा मिळाली असे भावोद्गार काव्य संग्रहाचे प्रकाशन प्रसंगी ईश्वर थडके यांनी काढले.
साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या पंचविसाव्या कार्यक्रमाची सुरुवात माधव ज्युलियन यांच्या 'मराठी असे आमुची मायबोली' या गीताने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय सौदागर यांनी केले. या कार्यक्रमात कु. वैभव ईश्वर थडके यांनी ' मोबाईल वेड', काजळ मुळीक हिने ' जागर स्त्री शक्तीचा ', सोमा गावडे यांनी ' काव्य एक अभिनव अभ्यास ', कवी स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी आपली ' इमान ' व ' मृगनयना ' ही मालवणी प्रसिद्ध कविता सादर केली तर डॉ. सुधाकर ठाकूर यांनी आरती प्रभू यांना लिहिलेल्या अनावृत पत्र वाचन केले, डॉ मधुकर घारपुरे यांनी 'सुंदरवाडीतील नारायण ' याचे वाचन केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, प्राध्यापक जयंत पाटील, पुरुषोत्तम दळवी, दत्तगुरु कांबळी, उत्तम भागीत, ममता जाधव मॅडम, कवी विशाल उगवेकर, देवयानी आजगावकर, चैताली जाधव, आर्या आजगावकर, अनिता सौदागर, प्रिया आजगावकर, एकनाथ शेटकर, मिरा ठाकूर, प्रकाश वराडकर, अरुण धर्णे,अनिल जोशी, प्रशांत रेगे इत्यादी साहित्यप्रेमी उपस्थित होते.