ब्राह्मण मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, वितरण शुभारंभ उत्साहात

अभ्यासक संदीप सिद्धये यांच्या हस्ते झाला प्रकाशन आणि वितरण शुभारंभ
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 19, 2022 17:19 PM
views 306  views

कुडाळ : महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२३ चे शानदार प्रकाशन आणि वितरण शुभारंभ नुकताच कुडाळ येथील पुरुषोत्तम सभागृहात करण्यात आला. ही दिनदर्शिका सिंधुदुर्गातील २५०० ब्राह्मण ज्ञातीकुटूंबांना वितरीत करण्यात येणार आहे.

कांदिवली येथील रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद साहित्याचे अभ्यासक संदीप सिद्धये यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि वितरण शुभारंभ करण्यात आला. कुडाळेश्वर, भगवान परशुराम, आर्यादूर्गा यांच्या चरणी दिनदर्शिका अर्पण करण्यासाठी यावेळी देण्यात आल्या आणि वितरण शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी देवगडचे माजी आमदार अॅड. अजित गोगटे, सावंतवाडीचे डाॅ. मुकूंद अंबापूरकर, सौ. डाॅ. मृदूला महाबळ अंबापूरकर, अरुण गोगटे, सुधाकर देवस्थळी, निलेश सरजोशी, सौ. मानसी आपटे, गुरुनाथ दामले, पु.ज. ओगले, पंचद्रवीड पतपेढीचे अध्यक्ष रवींद्र ओगले, मंडळाचे कुडाळ तालुकाध्यक्ष विवेक मुतालिक, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष श्रीकांत रानडे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मनोज वझे, श्रीधर गोरे, नेत्रा मुळ्ये, अर्चना हर्डीकर, प्रदीप प्रभुदेसाई, अंजली नातु, वर्षाराणी अभ्यंकर, केदार भिडे, मंदार पणशीकर, भाऊ बाक्रे, सुधीर जड्ये, सुभाष म्हैसकर, शिवानंद भिडे, विद्याधर पाटणकर, दिनदर्शिका निर्माण समितीचे प्रमुख विनायक गाडगीळ आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात परशुराम पूजनाने  झाली. यावेळी विदीशा आणि सुधा दामले यांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. त्याला दूर्गा संजय मुंडले, सुकृत दामले यांनी संगीतसाथ दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देणारे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंडळाच्या या दिनदर्शिकेसाठी ज्या ज्ञातीबांधव जाहिरातदारांनी जाहिराती दिल्या त्यांना यावेळी प्रातिनीधीक स्वरुपात आभारपत्र वितरीत करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक गाडगीळ यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ. सांप्रवी कशाळीकर यांनी केले तर आभार गुरुनाथ दामले यांनी मानले. या प्रकाशन आणि वितरण शुभारंभानंतर संदीप सिद्धये यांचे धर्म खरच कालसुसंगत असतो का? या विषयावर व्याख्यान झाले.