लक्ष्मण ठाकुर संकलीत पुस्तकाचा श्री विठ्ठल रखुमाई मंदीरात प्रकाशन सोहळा

Edited by:
Published on: April 26, 2025 12:08 PM
views 131  views

सावंतवाडी : कोकणचे पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदीर सावंतवाडी येथे लक्ष्मण पांडूरंग ठाकुर संकलीत पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोहळा १ मे २०२५ दिवशी विठ्ठल रखुमाई मंदीर सावंतवाडी येथे '५:३० वाजता आयाजित केला आहे.

या पुस्तक प्रकाशान सोहळा दामोदर कृ. सोमण जेष्ठ ख‌गोलतज्ज्ञ आणि पंचांग कर्ते ह्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला विद्यमान आमदार दीपक केसरकर, प्रदिप ढवळ (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,) अँड. दिलीप नार्वेकर, अध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती सावंतवाडी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत  होणार आहे. तसेच सायंकाळी सारेगमप लिटील चॅपम्स फेम यशस्वी जोडी प्रथमेश लघाटे, सौ. मुग्धा वैशंपायन-लाघाटे यांच्या स्वरांची भक्तिमय मैफील सादर करणार आहे. या  पुस्तकाचे संकलन सावंतवाडी शहराचे सुपुत्र लक्ष्मण पांडुरंग ठाकुर यांनी केले आहे. यावर्षी मंदीर व प. पु.  भाऊ मसूरकर त्यांची जन्म शताब्दी आहे.

हे दोन्ही योग विलक्षण रित्या जुळून आहे आहेत. याचे औचित्यसाधून या मं‌दीराचा इतिहास मंदिरातील स्थापीत मूर्ती या विषयी माहीती व साधुसंतांची तोंड ओळख पुस्तक रुपाने संकलित करण्यात आली आहे. लक्ष्मण पांडुरंग ठाकुर हे उद्योगखाते महारष्ट्र राज्य  या कार्यालयातून उपसंचालक म्हणून निव्वृत्त झाले आहेत. त्यांनी विशेश कार्यकारी अधिकारी म्हणून माजी मंत्री दिपक केसरकर व विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जवळ काम पाहीले आहे. या समारंभास उपस्थित रहावे अशी विनंती शाताब्दी समिती सावंतवाडी यांनी केले आहे.