संभाजी भिडे गुरुजी यांची मळेवाड येथे सोमवारी जाहिर सभा

32 मण हिंदवी स्वराज्य सिंहासन यावर करणार मार्गदर्शन
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 30, 2023 10:07 AM
views 376  views

सावंतवाडी : संभाजी भिडे गुरुजी प्रथमच सोमवारी, 1 मे रोजी मळेवाड गावात येत असून सर्व हिंदू समाजाला देव, देश, धर्म व ३२ मण हिंदवी स्वराज्य सिंहासन या विषयावर ते जाहिर मार्गदर्शन करणार आहेत.

गुरुजींच्या धगधगत्या, तेजस्वी, ओजस्वी वाणीतुन देव, देश, धर्म समजुन घेण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी आपले धर्म कर्तव्यच समजुन मळेवाड येथे सायंकाळी ठीक ५ वाजता मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.