वैश्यवाडातील हनुमान मंदिराचा सार्वजनिक गणेशोत्सव ; संकष्टी चतुर्थीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: October 01, 2023 16:37 PM
views 79  views

सावंतवाडी : सावंतवाडी वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात २१ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून सोमवारी २ ऑक्टोबर रोजी गणेशोत्सवातील संकष्टी चतुर्थी निमित्ताने दिवसभर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सोमवारी २ रोजी सकाळी ६.३० वाजता श्रींची महापूजा, त्यानंतर सामुदायिक अथर्वशिर्ष पठण, दुपारी महाआरती, श्रींना सहस्त्र मोदक नैवेद्य अर्पण व रात्री भाजनादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यावेळी शेकडो भाविक नैवेद्याचे तसेच नवस पूर्तीचे मोदक श्रीना अर्पण करतात. या धार्मिक कार्यक्रमांना सर्व भाविकांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, महाआरती, सहस्त्र मोदक अर्पण व भाजनादी कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव कमिटी तर्फे करण्यात आले आहे.