सावंतवाडी शहरातील सार्वजनिक गणपतीच विसर्जन...!

Edited by: विनायक गावस
Published on: September 29, 2023 15:15 PM
views 397  views

सावंतावडी : शहरातील सार्वजनिक गणपतीच गुरुवारी अनंत चतुर्दशीला रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. मोती तलाव येथे हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी गणेशभक्तांनी केली होती. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतिषबाजीसह मोठ्या जल्लोषात गणरायाला निरोप देण्यात आला.

नगरपरिषदेतील व्यापारी संकुल व मंडईच्या सुंदरवाडीच्या मोरया सह चितारआळीतील राजाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. माठेवाडा येथील 'तेजोमय' ढोल पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी साकारलेले देखावे, लाईटींग खास आकर्षण ठरले. फटाक्यांच्या आतिषबाजीसह भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं यावेळी घालण्यात आलं.