
सावंतवाडी : १ डिसेंबर हा दिवस 'जागतिक एड्स दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्य साधून शहरातील श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडी शहरामध्ये एड्स जनजागृती रॅली काढली. तसेच गांधी चौक येथे 'एड्स' या विषयावर पटनाट्याचे सादरीकरण करून जनजागृतीही केली.
या उपक्रमामध्ये एनसीसी, एनएसएस तसेच इतर शाखांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 'एड्स' या विषयावर सुयोग्य प्रचार होण्यासाठी व जनजागृतीसाठी शिक्षक व कर्मचारी यांनी अधिक मेहनत घेतली.