ओरोस धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून पिण्याच्या पाण्याची सोय !

Edited by: संदीप देसाई
Published on: June 17, 2023 15:26 PM
views 96  views

दोडामार्ग : सहाय्यक धर्मादाय आयुक्त ओरोस सिंधुदुर्ग या कार्यालयात येणाऱ्या नागरिक यांचेसाठी तसेच कर्मचारी वर्गासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पिण्याच्या  पाण्याचे सोय उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी लोकसहभागातून एक पाऊल पुढं टाकत लोकहीतासाठी स्वतः योगदान देत दर्जेदार वॉटर फिल्टर ची सोय उपलब्ध करून दिली आहे.    

  एखाद्या शासकीय कार्यालयात अशी कर्मचारी यांनी लोकांसाठी केलेली सोय खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल. जिल्हाधिकारी मुख्यालय इमारतीत असलेल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सिंधुदूर्ग येथे ही  सर्व लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी या कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अरुण भुईंबर, आणि आणि ऑडिटर अभय सुकाळी यांनी विशेष मेहनत घेतली.

त्यांच्या मेहनतीला नकुल पार्सेकर, अशोक पाडावे, मनवेल डिसोजा, दयानंद कुबल यांनीही सहकार्य केलं आहे. त्यामुळे इथ येणाऱ्या नागरिक, अभ्यांगत व या परिसरात कार्यरत असलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनाही स्वच्छ पाण्याची सोय झाली आहे.